राज्यात 2026 पासून नवीन अभ्यासक्रम लागू; आता ८ महत्त्वाचे निर्णय जाहीर New Education Policy 2026

New Education Policy 2026: शालेय शिक्षण विभागाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत २०२० (NEP 2020) मध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील पारंपारिक शालेय शिक्षण पद्धतीत मोठे बदल होणार असून, याबाबतचा शासन निर्णय १६ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात करण्यात आला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मधील तरतुदींनुसार हे बदल टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहेत.

१. नवीन आकृतीबंध रचना (५+३+३+४) लागू

पूर्वीच्या १०+२ या रचनेऐवजी आता ५+३+३+४ या चार टप्प्यांची नवीन रचना लागू करण्यात आली आहे:

टप्पावयोगटइयत्ता
पायाभूत स्तरवय ३ ते ८बालवाटिका १, २, ३ + इयत्ता १ ली व २ री
पूर्वतयारी स्तरवय ८ ते ११इयत्ता ३ री ते ५ वी
पूर्वमाध्यमिक स्तरवय ११ ते १४इयत्ता ६ वी ते ८ वी
माध्यमिक स्तरवय १४ ते १८इयत्ता ९ वी ते १२ वी

२. अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

अशा पद्धतीने नवीन अभ्यासक्रम २०२५-२६ पासून खालीलप्रमाणे लागू केल्या जाईल:

  • २०२५-२६: इयत्ता १ ली.
  • २०२६-२७: इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी.
  • २०२७-२८: इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी.
  • २०२८-२९: इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी.

३. भाषाशिक्षण धोरणात महपूर्ण बदल

शैक्षणिक आराखड्यानुसार भाषा विषयांच्या रचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत:

  • हिंदी अनिवार्य: मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी साठी ‘हिंदी’ ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचे प्रस्थापित आहे
  • त्रिभाषा सूत्र: अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषांचा अभ्यास इयत्ता १ ली पासूनच लागू करण्यात येईल. (New Education Policy 2026)

४. सेतू अभ्यासक्रम (Bridge Course)

नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पायाभूत समज पक्की करण्यासाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ राबवला जाईल. यामुळे जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमातील अंतर भरून काढण्यास विद्यार्थ्यांना मदत होईल.

५. नवीन पाठ्यपुस्तके आणि विषय योजना

  • अनुभवाधारित शिक्षण: NCERT च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन रंजक पाठ्यपुस्तके तयार करण्यात येतील. विद्यार्थ्यांवरील दप्तराचा आणि अभ्यासाचा ताण कमी करून सर्जनशीलता वाढवण्यावर भर देण्यात येईल.
  • विषय योजना (Subject Mapping): नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार विषयांची रचना बदलण्यात येईल, ज्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील.

६. मूल्यांकन पद्धतीत सुधारणा (HPC)

नवीन धोरणात केवळ गुणांवर आधारित निकालाऐवजी ‘होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड’ (Holistic Progress Card – HPC) मी नवीन पद्धत वापरली जाईल. यात विद्यार्थ्यांची कौशल्ये, सहभाग, तार्किक विचार आणि सर्जनशीलता यांचे मूल्यमापन केले जाईल.

७. शालेय वेळापत्रक आणि तासिकांचे नियोजन

नवीन अभ्यासक्रमाच्या आवश्यकतेनुसार शाळांचे वेळापत्रक, सत्रांचा कालावधी आणि तासिकांची संख्या यांचे फेरनियोजन संचालक मंडळाच्या सल्ल्याने करण्यात येईल.

निष्कर्ष: महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण अधिक शास्त्रीय आणि गुणवत्तापूर्ण होण्याची सुधारण्याची अपेक्षा आहे. हे धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक खूप महत्त्वाचे पाऊल ठरेल. अधिक माहितीसाठी शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही NEP 2025 ची PDF डाउनलोड करू शकता.

Leave a Comment